Breaking News

जेएनपीए-एसईझेड गुंतवणूकदारांना भविष्यात उत्तम संधी

इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 उत्साहात

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

जेएनपीएने मुंबईत भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने जेएनपीए-एसईझेड इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022चे आयोजन शुक्रवारी (दि. 27) केले होते. गुंतवणूकदारांना भविष्यातील विकासामध्ये गुंतवणुक करण्यासाठी व देशाच्या वाढत्या बंदर-उद्योग आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्होचे आयोजन करण्यात आले होते.

बंदर आधारित औद्योगिकीकरणाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, जेएनपीएने हा बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प 277.38 हेक्टर फ्रीहोल्ड जमिनीवर विकसित केला आहे. अशाप्रकारचे हे औद्योगिक केंद्र भारतातील पहिले बंदर-आधारित बहु-उत्पादन कार्यरत विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आहे. याबाबत जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, जेएनपीए एसईझेडच्या या विशिष्ट प्रकल्पासह बंदर-आधारित व्यवसाया वाढीच्या पैलूंना अधिक बळकट करण्यासाठी सज्ज आहे. या एसईझेडमध्ये सिंगल-विंडो क्लिअरन्स, मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधां उपलब्ध आहेत. भारतामध्ये व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी हा एक आदर्श पर्याय आहे.

अतिरिक्त आर्थिक क्रियाकलाप निर्माण करणे निर्यात व गुंतवणुकीला चालना, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास हे जेएनपीए सेझची उद्दिष्टे आहेत. जेएनपीए-एसईझेड  गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी विशेष प्रोत्साहन देत आहे. जेएनपीए-एसईझेडसाठी विविध पायाभूत सुविधां विकासित करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये रस्ते, वीज, पाणी, स्ट्रॉम वॉटर ड्रेन, सांडपाणी संकलन व उपचार आणि घनकचरा विल्हेवाट सारख्या सर्व मूलभूत पायाभूत सुविधांचा समावेश आहे. एसईझेडच्या सर्व भूखंडाना रस्ते, पाणी, वीज आणि सांडपाण्याची लाईन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेएनपीए-एसईझेड मधील भूखंड वाटपासाठी ई-निविदा सह  ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते, ज्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक होते.

कॉन्क्लेव्ह दरम्यान, जेएनपीए एसईझेडमध्ये बंदर आधारित औद्योगिकीकरण: संभाव्य संधी आणि जेएनपीए-सेझ: व्यवसाय सुलभीकरण या विषयावर पॅनेल चर्चा झाली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बंदरांचे महत्त्वही कॉन्क्लेव्हमध्ये अधोरेखित करण्यात आले आणि बी टू बी बैठका झाल्या. या कार्यक्रमास जेएनपीएचे उपाध्यक्ष  उन्मेष शरद वाघ, विभागीय विकास आयुक्त श्याम जगन्नाथन, सीमाशुल्क आयुक्त एन. व्ही. कुलकर्णी, नितिन बोरवणकर, सीईओ, जेएनपीए-सेझ उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply