मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलच्या 15व्या हंगामाला 26 मार्च रोजी सुरुवात झाली होती. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रविवारी (दि. 29) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामाचे विजेतपद मिळवण्यासाठी गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील. या सामन्यासाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या सामन्यासाठी आपली उपस्थिती लावणार आहेत.