पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 2 मेदरम्यान गव्हाण येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवली. त्यांच्या आदर्शाचा वारसा अखंड सुरू आहे. त्या अनुषंगाने गव्हाण ग्रामपंचायत विभागात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.
गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथे रविवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता या अभियानाचे उद्घाटन होणार असून यामध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …