Breaking News

म्हसळा मार्केटमध्ये ओल्या हळदीचे आगमन

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा मार्केटमध्ये सध्या ओल्या हळदीचे आगमन झाले असून या हळदीकडे सर्वच जण आकर्षित होत आहेत. ग्राहक आलं-मिरची घेण्यासाठी जातो तेव्हा तिथे आल्याच्या शेजारी आल्यासारखीच दिसणारी ओली हळद आपलं लक्ष वेधून घेते.

ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करून आरोग्यास फायदा करून घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात तिचा भावही सामान्य ग्राहकाना परवडेल असा 80-100 प्रातीकिलो आहे.

सध्या म्हसळा भाजी बाजारात जांभळ्या, हिरवट, पांढर्‍या रंगाची वांगी, लालबुंद गाजरे, लिंबू, हिरव्या वाटाण्याच्या शेंगा (मटार), मेथी, कांदापात, कोथिंबीर यांचा मोहक हिरवा रंग, कोबी, फ्लावर, भोपळी मिरची, भेंडी, गवार, फरसबी, शेवगा अशा वेगवेगळ्या भाज्या व फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर म्हसळे येथील जुने व अनुभवी भाजी व्यापारी अशोकशेट अडागळे यांनी आपल्या गाळ्यात खास आकर्षण ठरणारी ओली हळदही ठेवली आहे.

ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी नेहमीच ओली हळद आठवणीने आण हो, असे आवर्जून सांगतात.

-विलास यादव, निवृत्त गुरुजी

हळदीचे छोटे काप किंवा किसून हळद, आलं आणि मिरची व आवश्यकतेनुसार लिंबू असे लोणचे छान होते.

-करडेकाकू, ग्राहक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply