पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच, आजी-माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा व भाजप कार्यकर्ता मेळावा बुधवारी (दि. 1 जून) सायंकाळी 6 वाजता नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदगाव विठ्ठल रखुमाई मंदिर गार्डन येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत व हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. या वेळी नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश भिकाजी गायकर, काशिनाथ (भगत) महादू पाटील (वडवली), विद्यमान सदस्य कल्पेश बाबुराव पाटील, कुंदा शिवराम पाटील, साधना प्रवीण गायकर, रामदास सुकर्या कातकरी, माजी सदस्य बाबुराव मधुकर पाटील, चंद्रा बाबुराव पाटील, संदीप नाना पाटील, शिवराम पाटील तसेच रोहिदास गायकर यांच्यासह नांदगाव, कुडावे व वडवलीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमास भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.