लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्ताने खारघरमधील अनाथालयामध्ये फळवाटप व खाऊवाटप करण्यात आले.
खारघर सेक्टर 12 मधील गिरिजाघर वेलफेअर असोसिएशनमधील अनाथालयाला भेट देऊन पनवेल महानगरपालिका प्रभाग 5 चे नगरसेवक रामजी बेरा यांनी दरवर्षीप्रमाणे फळवाटप व खाऊवाटप हा उपक्रम राबविला.
या वेळी प्रभाग 4चे नगरसेवक प्रवीण पाटील, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील व गिरीजाघर वेलफेअरचे व्यवस्थापक वसंत कुंजीर उपस्थित होते.