Breaking News

आसुडगावात विकासकामांचा शुभारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचा शुभारंभ कण्यात आला. त्यानुसार नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या नगरसेवक निधीमधून अनेक विकासकामे आसुडगाव मध्ये करण्यात आली आहे. या कामांचा शुभारंभ नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या नगरसेवक निधीमधून आसुडगावातील गावदेवी मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या कामाचे तसेच बेंचेसचे उद्घाटन आणि परिसरातील सोसायट्यांना डस्टबीन वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

या कामांचे उद्घाटन तसेच वाटप नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

या वेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, आसुडगावचे माजी सरपंच सिताराम हुदार, विजय भोपी, शशिकांत शेळके, वळवलीचे माजी सरपंच दिलीप पाटील, पांडुरंग म्हात्रे, हरिचंद्र म्हात्रे, हनुमंत पवार, बाबाजी पाटील, राजाराम कुमार, श्री. भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply