Breaking News

‘ती’ हत्या लुटीच्या उद्देशाने

अर्धवट जळालेल्या मृतदेहाची उकल; पाच आरोपी गजाआड

पनवेल : वार्ताहर

पनवेल रेल्वेस्थानकालगतच्या झुडपामध्ये आढळून आलेल्या अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात, तसेच त्याची हत्या करणार्‍या पाच आरोपींना जेरबंद करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. अमरजितसिंग पाल असे या हत्या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव असून, त्याची हत्या लूटमारीच्या उद्देशाने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पनवेल शहर पोलिसांनी अमरजितसिंग राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्यासोबतच्या पाच तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीत अमरजितसिंग याची हत्या त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींमध्ये घनश्याम सुंदर चंद्राकार (22, छत्तीसगड), मल्लू महादेव अप्पा पुजारी (कर्नाटक), विकास सीताराम कारंडे (20, सातारा), मोईन बिजलाल खाटिक (22, मध्य प्रदेश) व जितेंद्र गणेश यादव (30, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाणांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, ईशन खरोटे, देवीदास पालवे, हवालदार विजय आयरे, भानुदास मोटे, रवींद्र कोळी, दिलीप चौधरी, रवींद्र राऊत, शिपाई मिलिंद ठाकूर, सुनील महाले, दिनेश जोशी, अमरदीप वाघमारे, पंकज पवार, राजेश मोरे, नैनेश पाटील, संजय फुलकर, अशफाक शेख, जेजुरकर, केशव शिंदे, यादवराव घुले, राहुल साळुंखे, सुनील गर्दनमारे, अजय कदम आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply