Breaking News

डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन

रोहे : प्रतिनिधी

कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भारतीय आयुर्विमा रोहा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच या महाविद्यालयाच्या सभागृहात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन रोहा आयुर्विमा शाखेचे शाखाधिकारी पद्माकर भोईर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशीदास मोकल, आयुर्विमा अधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक अधिकारी चेतन वाघमारे, प्रकाश गायकवाड, प्रा. सुकुमार पाटील, प्रा. सीमा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे 160 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. तुळशीदास मोकल यांनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात व्यवसाय हा महत्त्वाचा असून तो नोकरी अथवा उद्योग अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, मात्र त्याच्या प्राप्तीसाठी माणसाकडे ध्येय, चिकाटी, महत्त्वाकांक्षा व मेहनत आवश्यक असते. या सर्व गोष्टींचा अंगीकार केलात तर तुम्हाला व्यवसाय सहज प्राप्त होऊ शकतो, असे सूचक भाष्य केले. आयुर्विमा शाखाधिकारी पद्माकर भोईर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आयुर्विम्यातील अर्ध वेळ, पूर्ण वेळ, कमवा व शिका, या कामाच्या संधीबाबत मार्गदर्शन केले.तसेच खासगी व शासकीय क्षेत्रातील नोकरीतील संधींबाबत अनमोल मार्गदर्शन केले. प्रकाश गायकवाड यांनी या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्रास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात अंजली मोदी, उद्देश घवाले, हर्षाली शिंदे, श्रेया मोरे, रोहन पाटील, हर्षदा तांडेल या विद्यार्थ्यांचा रोहा आयुर्विमा शाखेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सुकुमार पाटील यांनी मानले. या वेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply