माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 97.97 टक्के लागला असून शेख झररीन फातिमा शेख चांद हिने 88.33 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. हादीया अन्वर चिलवान आणि अफनान आदम राऊत (87.33 टक्के) यांनी द्वितीय तर अवेस जमालुद्दीन राऊत (85 टक्के) याने कॉलेजमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. यावर्षी या कॉलेजचे एकूण 99 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 97 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 17 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून 43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 32 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सैफुद्दीन धनसे, उपाध्यक्ष डॉ. मोहसीन राऊत, सेक्रेटरी अस्लम राऊत, स्कुल कमिटी चेअरमन डॉ. मैनुद्दीन राऊत, खजिनदार हुसेन हर्णेकर, सहसचिव अ.कादिर हर्णेकर, प्रशासक आसफ पल्लवकर, मुख्याध्यापक खालिद अहमद खान यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.