Breaking News

पनवेल शहरात सात ठिकाणी हायमास्ट

नगरसेवक अनिल भगत यांच्या निधीतून सुविधा

पनवेल: रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे नगरसेवक नागरीकांना विविध सुविधा देण्यात करीता सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याअंतर्गत नगरसेवक अनिल भगत यांच्या नगरसेवक निधीमधून शहरातील सात ठिकाणी हायमास्ट उभारण्यात आले आहेत. या हायमास्टचे गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले.

पनवेल शहरातील कोळीवाडा येथील विसर्जन घाट, कोळीवाडा, स्मशानभुमी, भारतगॅस, रोहिदास वाडा, महावितरण कंपनी समोर तसेच नवनाथ मंदिर या ठिकाणी नगरसेवक अनिल भगत यांच्या नगरसेवक निधीमधून हायमास्ट उभारण्यात आले असून त्याचे मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवण सोनी, मंगेश पिलविळकर, विलास गायकवाड, हरिचंद्र भगत, दत्ता पाटील, संदीप पाटील, प्रसाद कंधारे, तानाजी झुगे, निर्मला वैती, सुनील खलदे, गणेश भगत, गजानन भगत, हरिचंद्र भोईर, विनायक मुंबईकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply