संत निरंकारी मिशनचा उपक्रम
महाड : प्रतिनिधी
जागतिक हवामान दिनानिमित्त संत निरंकारी मिशन व एम्बायो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एम्बायो लिमिटेड कंपनीच्या महाड एमआयडीसीमधील दीड एकर जमिनीत सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
संत निरंकारी मिशनचे रायगड व चिपळूण झोन प्रमुख प्रकाश म्हात्रे, रायगडचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड सेक्टर संयोजक दयाळ पारधी, विठ्ठल कंक, एम्बायो लिमिटेडचे आर. के. गीते, ए. जी. स्वामीनाथन यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या वेळ वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित होते.
एम्बायो लिमिटेडचे आर. के. गीते आणि ए. जी. स्वामीनाथन यांनी निरंकारी मिशनच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचे कौतुक केले. संत निरंकारी मिशनचे महाड सेवादल युनिट शिक्षक अनिल सकपाळ यांनी मिशनच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी वड, पिंपळ, गुलमोहर, बदाम, निव, अशोक, जांभूळ, करंज आदीं प्रकाराच्या सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.