पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले.
या समारंभास जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे भाजप गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, उपसरपंच उज्ज्वला ठाकूर, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, आपट्याचे माजी सरपंच दत्ता पाटील, तार्याचे माजी उपसरपंच विद्याधर जोशी, उद्योगपती राजू पाटील, केळवण्याचे माजी उपसरपंच भानूदास गावंड, भाजप युवा मोर्चा केळवणे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष सुशील ठाकूर, उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग म्हात्रे, मुक्ताबाई माळी, शर्मिला माळी, सीता ठाकूर, राजेंद्र ठाकूर, भाजप नेते विलास ठाकूर, योगेश घरत, सुरज घरत, राजेंद्र ठाकूर, तेजस माळी, हरिश्चंद्र माळी, संजय पाटील, राजेश घरत, महादेव म्हात्रे, संजय पाटील, समीर ठाकूर, के. जी. पाटील, मिलिंद कोळी, संजय कोळी, पांडुरंग पाटील, कृष्णा म्हात्रे, अनंता गावंड, सुरज घरत, परमेश घरत, बाळू ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या योजनेंतर्गत केळवणे गावामध्ये प्रत्येक घरात पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि आमदार महेश बालदी यांचे आभार मानले, तर 50 महिलांना शिलाई मशीन दिल्याबद्दल जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांना धन्यवाद दिले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …