तळोजा ः रामप्रहर वृत्त : सिडकोच्या दर्जेदार बांधकाम निर्मितीची पायाभरणी तळोजा येथील काँक्रीट प्री कास्टींग फॅ क्टरीमध्ये होते, असे उद्गार सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काढले. सिडकोच्या तळोजा येथील काँक्रीट प्री कास्टींग फॅ क्टरीला भेट दिली असता त्यांनी हे उद्गार काढले.
सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांमधील इमारतींच्या बांधकामाकरिता बीम, कॉलम, स्लॅब, रेकर तयार करणे, सळई कटिंग, स्लॅब डिझाईन इ. कामांकरिता सेक्टर-27, तळोजा आणि द्रोणागिरी येथे प्री कास्टींग फॅ क्टरी आहेत. तळोजा येथील फॅ क्टरी 1.2 हेक्टर इतक्या क्षेत्रफळावर वसली असून तेथे प्रतितास 30 घनमीटर क्षमतेचे तीन बॅचींग प्लॅन्ट आहेत. सदर फॅ क्टरीमध्ये प्री कास्ट बीम, कॉलम, स्लॅब उत्पादन करण्यात येते. या फॅ क्टरीत प्रतिदिन 22 प्री कास्ट रेकर्स निर्माण केले जातात. येथे स्लॅबकरिता एक गाळा राखीव असून प्री कास्टींगची क्षमता 268 स्लॅब प्रतिदिन इतकी आहे, तसेच स्लॅबकरिता खास डिझाईन केलेल्या तराई चेंबरचा वापर येथे केला जातो. सळई कटिंग आणि फिक्सिंगसाठी पूर्णत: स्वयंचलित असलेली चार मशिन्स येथे कार्यरत आहेत. येथील सर्व यंत्रणा व कार्यप्रणाली ही स्पेनमधून प्रमाणित करण्यात आली आहे.
द्रोणागिरी येथे प्री कास्ट बीम्सचे स्वतंत्र युनिट असून त्याची उत्पादन क्षमता प्रतिदिन 122 इतकी आहे. येथील स्लॅब प्री कास्टींगची क्षमता 70 स्लॅब प्रतिदिन इतकी आहे. तळोजा येथील प्री कास्टींग कारखान्यांमध्ये इमारतींकरिता आवश्यक घटकांचे उत्पादन हे वेगाने सुरू असून त्यामुळे नजीकच्या काळातील सिडकोच्या गृहनिर्माण योजना नियोजित कालावधीत पूर्ण करणे शक्य होईल, असेही उद्गार या वेळी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी काढले.
सिडकोतर्फे सन 2018मध्ये सिडको गृहनिर्माण योजना ऑगस्ट 2018 अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील 14,838 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेतील घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सिडकोच्या गृहनिर्माण योजनांतर्गत बांधल्या जाणार्या इमारतींचे बांधकाम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असावे याकरिता तळोजा व द्रोणागिरी येथील प्री कास्टींग कारखान्यांत प्री-फॅ ब 3-एस या तंत्रज्ञानाचा अवलंब करून इमारतींकरिता आवश्यक अशा विविध घटकांचे उत्पादन करण्यात येते. या प्रक्रियेमध्ये विविध बांधकाम घटकांचे प्री-फॅ ब्रिकेशन, इरेक्शन आणि कनेक्शन यांचा समावेश होतो. सदर दोन कारखान्यांतील बहुतांशी उत्पादन हे स्वयंचलित प्रणालीद्वारे निर्मिण्यात येते. याप्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मुख्य अभियंता, नवी मुंबई केशव वरखेडकर, अति. मुख्य अभियंता, नवी मुंबई मेट्रो के. एम. गोडबोले, अधीक्षक अभियंता, गृहनिर्माण, चंद्रेश ठक्कर, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे आणि सिडकोतील अन्य अधिकारी उपस्थित होते.