Breaking News

पेणनजीक धरमतर येथे चीनचा नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चीनमधील नाइन ड्रॅगन्स पेपर्स या

कंपनीमध्ये शनिवारी करार झाला. त्यानुसार रायगडमधील धरमतर येथे नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प उभारणार असून, येत्या पाच वर्षांत साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, तसेच या कालावधीत 10 हजार कोकणवासीयांसाठी नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन आणि नाइन ड्रॅगन्स पेपर्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिंग छोंग ड्यू यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतीश गवई, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, कंपनीचे अध्यक्ष येन छोंग, उपाध्यक्ष केन ल्यू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी छेंग फेइ चांग आदी उपस्थित होते.  नाइन ड्रॅगन्सने राज्यात पेपर निर्मितीचा उद्योग उभारण्याचा घेतलेला निर्णय दोन्ही देशांतील औद्योगिक घडामोडींमधील मैलाचा दगड ठरेल. कंपनी उभारणीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या  करारानुसार येत्या दोन-तीन वर्षांत सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर प्रकल्प सुरू होणार आहे. यातून तीन हजार प्रत्यक्ष; तर चारपट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply