अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण व सोडत येत्या सोमवारी (दि. 13) काढण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने तसा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगर परिषदांच्या आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणार्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी संबंधित नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरक्षण सोडतीचे ठिकाण वेळ तसेच आरक्षण व सोडतीवरील हरकती स्वीकारण्याचे ठिकाण, वेळ निश्चित करण्यात आली आहे.
प्रत्येक नगर परिषदेत 13 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आरक्षण सोडत तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 15 ते 21 जूनपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …