पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेने सिडको वसाहतींमधील मान्सूनपूर्व कामे हाती असून ही कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभुमीवर कळंबोली शहरामध्ये सुरू असललेल्या नालसफाई तसेच गटारांच्या कामांची पाहणी प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील यांनी शुक्रवारी (दि. 10) केली तसेच अधिकरार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पनवेल महापलिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमधील मान्सूनपूर्व कामे महापालिका करणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याअंतर्गत कळंबोली परिसरामध्ये 2005 निर्माण झालेली पुरस्थिती पुन्हा उद्भवू नये तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही समस्या हाोऊ नये याकरीता प्रभाग समिती ब मधील कामांची पाहणी सभापती प्रमिला पाटील यांनी अधिकार्यांसह केली.
या दरम्यान त्यांनी होल्डिंग पॉईंट्स मोठे असलेले नाले, पंप हाऊस आणि नालेसफाईच्या कामांची या पाहणी केली. या वेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, सरचिटणीस दिलीप बिस्ट, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, राहुल जाधव, किरण घाडगे, हर्षद निकुंभ आदी उपस्थित होते.