Breaking News

कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा

पनवेल : वार्ताहर

कूंग फू स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पनवेलमध्ये मुंबई विभागीय कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला.

पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केएफएसए ओएमचे अध्यक्ष विवेक द्विवेदी, उपाध्यक्ष इस्सार शेख, सचिव अजय सिंह बुंदेला, खजिनदार ओमकार पवार, तसेच सूरज नाईक, यश पाखरे, शिफा सय्यद आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सुमारे 100 स्पर्धक सहभागी झाले होते. चेंबूरच्या मार्शल आर्टस्ने चॅम्पियनशीप दोन ट्रॉफी; तर मुंबईच्या कुंग फू स्पोर्ट्स असोसिएशनने एक सेंट चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply