Breaking News

उरण पालिकेकडून निर्माल्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती

उरण ः वार्ताहर

उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जन ठिकाणी निर्माल्य तलावात न टाकता गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली होती. नगर परिषदेने विमला आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खत निर्मिती केली आहे. यासाठी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण तालुका भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, कनिष्ठ अभियंता झुंबर माने, सर्व कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळाले. जल, नैसर्गिक व मानवनिर्मित पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन व संरक्षण व्हावे, तलावातील पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्य तलावात न टाकता ते कलशात टाकावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जमा केलेल्या निर्माल्यापासून बायो गॅस व खत निर्मिती करण्यात आली. त्यामुळे जनतेचे आभार, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी संतोष माळी यांनी व्यक्त केली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply