पनवेल : रामप्रहर वृत्त
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र आयोजित पुरस्कार सोहळा 2022 या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मंगळवारी (दि. 14) त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानचित्राने त्यांना गौरविण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, नवी मुंबई सदस्य सुनील भोईर व पनवेल सदस्य योगेश पगडे उपस्थित होते.