कर्जत : बातमीदार
तालुक्यातील दामत या मुस्लिमबहुल गावातील कार्यकर्त्यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर आणि नितीन कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दामत गावातील ताहीद खान, रातीक खान, बबलू नजे, इरशाद आढाळ, आकिल नजे, ओमर नजे, वसिम बोस्तेकर, इजाझ नजे, याकुब आढाळ, सुफी आढाळ, कयुम तिवाळे, इमरान नजे, सद्दाम काजी, अरफात पोजेकर, चाचू सफरान, मोसिन नजे, जलाल काजी, सहबाज नजे, कैफ खोत, सलमान नजे, सुफियान नजे, इजाझ तिवाळे, फयझान आढाळ, अरफाज आढाळ, अलताफ तिवाळे, आरतिक आढाळ, फैजान आढाळ, अब्दुल्ला तिवाळे, मोसीन नजे, रितिक आढाळ, सिराज नजे, कयुम टिवाळे, तेजपाल नजे, अलताफ नजे, मोबीन नजे या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपचे रायगड जिल्हा संघटन मंत्री अविनाश कोळी, कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत संजय कराळे, युवामोर्चाचे किरण ठाकरे, ऋषिकेश जोशी, भाजप नेरळ शहर माजी अध्यक्ष अनिल जैन, अनिल पटेल, भाजप अल्पसंख्यांक सेलचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल हक नजे, समीर नजे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.