Breaking News

‘विद्यार्थी व पालकांनी एकमेकांवर अपेक्षांचे ओझे लादू नये’

पनवेल : रामप्रहर वृत्त

विद्यार्थी व पालक यांनी आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे एकमेकांवर लादू नये तसेच प्रत्येक बालक हे वेगळे असते त्यामुळे त्याची इतरांशी तुलना करू नका, असे कळकळीचे आवाहन विद्यार्थी समुपदेशक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात प्रभावी पालकत्व आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर त्या प्रेक्षकांशी संवाद साधत होत्या. डॉ. कुलकर्णी पुढे सांगितले की, एक मूल बिघडल्याने इतर मुले बिघडतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सगळी मुले आपली मुले आहेत या भावनेने त्यांच्याकडे बघा आणि सामाजिक पालकत्व जपा. स्वयंम अभ्यास, सातत्य, आत्मविश्वास, एकाग्रता, ध्येयाप्रती सजग वाटचाल यामुळे परीक्षेच्या भीतीवर मात करता येते. दडपण न घेता उत्सव समजून परीक्षा साजरी करा. टिकटॉक, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, मोबाईल चित्रपट मित्र नातेवाईक उत्सव समारंभ यापासून लांब राहा. व्यवस्थितपणा स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा यामुळे अभ्यास चांगला व लवकर होतो. शरीर व मन ठणठणीत राहण्यासाठी सकस आहार घ्या. तोही घरचा मनःशांतीसाठी दीर्घ श्वसन व प्राणायाम करा. निसर्गाकडे डोळस नजरेने पहा असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला. यासोबतच त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक व समाधानकारक उत्तरे दिली. सिटिजन्स युनिटी फोरम (कफ) व डॉ. बिरमोळे यांनी यांनी फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी पालकत्व आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर संवादमाला आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिचय व आभार कफचे कार्यकर्ते मकरंद देसाई यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने या बोधप्रद कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply