Breaking News

स्टोक्स, आर्चर भारतात दाखल

लंडन : वृत्तसंस्था

भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भारतात दाखल झाले आहेत. स्टोक्सने विमानातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबतची माहिती दिली. या फोटोवर त्याने ‘भारतीयांनो, लवकरच भेटूयात’ असे कॅप्शनही दिले आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकला असून, दुसरा सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. तत्पूवीर श्रीलंका दौर्‍यात आराम देण्यात आलेल्या खेळाडूंचे भारतामध्ये आगमन झाले आहे. यामध्ये बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्स यांचा समावेश आहे. स्टोक्सने भारतात येण्यासाठी रवाना झाल्याचे सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना सांगितले, मात्र काही नेटकर्‍यांनी स्टोक्सला ट्रोल केले आहे. त्याच्यावर अनेक मजेदार मिम्सही पोस्ट करण्यात आले आहेत.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply