Breaking News

पनवेलमध्ये शुक्रवारपासून 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

नाट्य-सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची जमणार मांदियाळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या 12व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी 5, 6 आणि 7 डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
राज्यभरातून निवड झालेल्या उत्कृष्ट 25 एकांकिका या तीन दिवसांच्या महाअंतिम फेरीत सादर होणार आहेत. विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माते सुनील बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाअंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, तेजस कांडपिळे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष रूचिता लोंढे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज यांची उपस्थिती असणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 7) सायंकाळी 4 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या वेळी गौरव रंगभूमीचा पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी व सुनील बर्वे, सन्माननीय म्हणून माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई प्रमुख कार्यवाह अजित भुरे, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, भरत सावले, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते सुव्रत जोशी, अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद शेलार, प्रमोद अत्रे तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर आदींची उपस्थिती असणार आहे.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिवशी प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री त्यांच्या खास शैलीत बहारदार सूत्रसंचालन करणार आहेत तसेच हास्यजत्रा फेम अरुण कदम, श्याम राजपूत व चेतना भट; त्याचबरोबर हास्य सम्राट विजेते प्रा. दीपक देशपांडे यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.
महाअंतिम फेरीच्या अनुषंगाने नाट्य एकांकिकांचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, अटल करंडक आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष विलास कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. पाटील आणि टीम अटल करंडक यांनी केले आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply