Breaking News

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी अॅड. महेश मोहिते

मुरूड तालुका भाजपकडून विशेष सत्कार

मुरूड : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा मुरूड शहर भाजप कार्यालयात रविवारी (दि. 19) ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुकीचे नियोजन आणि तयारीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून   रायगड लोकसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची तर संयोजक म्हणून अ‍ॅड. महेश मोहिते यांची नियुक्ती कारण्यात आली आहे. त्याबद्दल मुरूड तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे दोघांचेही अभिनंदन करण्यात आले आहे. अ‍ॅड. महेश मोहिते रविवारी मुरूड दौर्‍यावर आले असता शहरातील पक्ष कार्यालयात ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी त्यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.  या वेळी आण्णा कंधारे यांनी अ‍ॅड. मोहिते यांच्या पक्षकार्याचे कौतुक केले.

भाजपचे मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर,  उपाध्यक्ष परेश किल्लेकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, युवती अध्यक्षा भाविका किल्लेकर, महेश मानकर, सहसचिव नरेश वारगे, संघटक प्रवीण बैकर, बाळा भगत, हनीफ उलडे, सुधीर पाटील, शैलेश काते, समीर शिंदे, जगदीश पाटील, मंदाकिनी कासेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply