Breaking News

मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची निवडणूक वॉर्डनुसार व्हावी; सभासदांची मागणी

मुरुड : प्रतिनिधी

तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या वॉर्ड रचनेबाबतची सुनावणी रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अलिबाग कार्यालयात मंगळवारी (दि. 21) घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे सभासद जनार्दन कंधारे, भाजपचे तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उमेश माळी, विनोद भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी विक्री संघाचे  1304 सभासद असून संस्थेची वार्षिक उलाढाल कोट्यवधींची रुपयांची आहे. त्यामुळे या सुपारी संघावर प्राबल्य राखण्यासाठी विविध पक्षातील लोक प्रयत्न करीत असतात. येत्या जुलै महिन्यात या सुपारी संघाची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रारूप याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सहकार खात्यामार्फत जारी करण्यात आला आहे.

पूर्वी सुपारी सुपारी संघाच्या सात वॉर्डमधून सात संचालक निवडून येत होते, परंतु आताच्या निवडणूक कार्यक्रमात सात वॉर्ड मिळून एकच वॉर्ड तयार करण्यात आला आहे. यावर संस्थेचे अनेक सभासद नाराज असून पूर्वीप्रमाणेच सात वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सुपारी संघाचे सभासद सुधीर पाटील, विनोद भगत, जनार्दन कंधारे, जयंत चौलकर, उमेश माळी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबतची सुनावणी अलिबाग येथील कार्यालयात मंगळवारी होणार आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply