Breaking News

पनवेल मनपा आपत्ती व्यवस्थापन सज्ज

बैठकीत विविध विषयांवर चर्चा व नियोजन

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्ती आल्यास लागणार्‍या अत्यावश्यक विविध वस्तू, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती काळात लागणारे अत्यावश्यक फोन नंबर अशा विविध विषयांचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या मंगळवारी (दि. 21) मुख्यालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला.

या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग अधिकारी, मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेमार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पावसाळ्यादरम्यान येणार्‍या आपत्ती नियंत्रणासाठी 24 तास सुरू असलेले नियंत्रण कक्ष मुख्यालय येथील अग्निशामन विभागात तळमजल्यावर सुसज्ज करण्यात आले आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

आपत्ती काळात मुख्यालय आणि प्रभाग समितीच्या कर्मचार्‍यांनी एकमेकांमध्ये संवाद साधून काम करावे, अशा सूचना या वेळी प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आल्या. वृक्षांची पडझड / वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील खड्डे, आग व आगीचे विविध प्रकार, इमारत कोसळणे, रस्ते व नाल्याजवळ साचलेला कचरा, भूस्खलन, रस्तावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर / पूरसदृश परिस्थिती, व्यक्तीचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, पाणी साचणे, साथीचे रोग यापैकी कोणतीही आपत्ती उद्वभवल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारी अथवा विनंतीची दखल घेतली जाऊन त्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात येईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

आपत्ती काळात संपर्क

  1. प्रभाग समिती ‘अ’ खारघर प्रभाग, अधिकारी जितेंद्र मढवी मो. नं. 9819998788
  2. प्रभाग ‘ब’ कळंबोली,प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे मो.नं 9819633174 ,

3.प्रभाग ‘क’,प्रभाग अरविंद पाटील मो. नं. 9322351897, स्वच्छता निरीक्षक ऋषीकेश गायकवाड (प्रभाग क्र.11,12) मो. नं. 9619314475, स्वच्छता निरीक्षक अतुल वास्कर (प्रभाग12) मो. नं. 8452961094, स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे (प्रभाग क्र14) मो. नं. 8169254174

  1. प्रभाग ‘ड’ प्रभाग अधिकारी अमर पाटील मो. नं. 8369673169 तसेच मुख्यालयातील अग्निशमन विभागास 022-27458040/41/42, दुरध्वनी 022-27469500, टोल फ्री :- 1800227701 व व्हॉट्सअ‍ॅप 9769012012 या क्रमांकावरती नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply