पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक योग दिन व विश्व संगीत दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात दोन्ही दिन उत्साहात साजरे करण्यात आले.
या निमित्ताने शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये गीते सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, तसेच जागतिक योग दिनानिमित्त समिता माता (वाय. एस.एम. नेरूळ संस्थेच्या योग शिक्षिका व संध्या श्रीधर (योग प्रशिक्षिका) यांनी उपस्थित राहून शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना विविध मुद्रा व आसने यांविषयी माहिती करून देत प्रात्यकक्षिकांसह मार्गदर्शन केले.
पालकवर्गासाठी आयोजित कार्यक्रमात अंबिका कुटीर सी. बी.डी बेलापूर या संस्थेतील सदस्यांनी एकपाद, चक्रासन यांसारखी आसने प्रत्यक्ष करून योग साधनेची अनुभूती करून दिली व सहज योग साधनेच्या सदस्या कविता चव्हाण यांनी योग आणि योगातील फरक अत्यंत सोप्या पद्धतीने स्पष्ट केला. अशाप्रकारे उपस्थित पाहण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.