Breaking News

स्थानिक टॅक्सीचालकांवरील अन्याय दूर करा

भाजपप्रणित कामगार संघटनेची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
बाहेरून येणारे रिक्षा चालक स्थानिक टॅक्सीचालकांवर करत असलेल्या अन्याय आणि दमदाटीवर येत्या सात दिवसांत कडक कारवाई करावी; अन्यथा मोर्चा काढू असा इशारा भाजप प्रणित वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने तसेच रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी (दि. 30) दिला आहे. पनवेल परिसरातील खांदा कॉलनी, कळंबोली, नावडे गाव पाणी टाकी, तोंडरे फाटा या ठिकाणी बाहेरून येणारे रिक्षाचालकांची खूप दादागिरी वाढली असून त्यामुळे स्थानिक टॅक्सचालकांवर अन्याय होत आहे. हे रिक्षाचालक प्रवाश्यांना स्थानिकांच्या गाडीमध्ये बसू देत नाहीत तसेच पनवेल ते आय.जी.पी.एल. स्टॅण्ड अधिकृत मेन रोडला छोट्या रिक्षाचे अनधिकृत स्टॅण्ड झाले आहेत. त्यामुळे स्थानिक टॅक्सीचालकांवर उपासमारी वेळ आली आहे. टॅक्सी चालकांच्या या समस्येसंदर्भात भाजप प्रणीत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक आणि विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी आरटीओ कार्यालयात भेट देऊन सहाय्यक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांच्याशी समस्येबाबत सविस्तर चर्चा करून टॅक्सी चालकांच्या समस्या या वेळी मांडल्या. बाहेरून येणार्‍या एमएच04, एमएच-01, एमएच-03, एमएच-02, एमएच-05 आणि एमएच-43 या पासींगव्या गाड्यांवर येत्या 7 दिवसांत कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला. या वेळी विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, उपाध्यक्ष दीपक नावडेकर, जिल्हा प्रतिनिधी राजू भंडारी, पनवेल अध्यक्ष शाम भगत, रायगड प्रतिनिधी शंकर पाटील, पनवेल उपाध्यक्ष संतोष पाटील, दहिसर अध्यक्ष हेमंत म्हात्रे, दहिसर उपाध्यक्ष मयूर पाटील, गजानन भागवत, संतोष म्हात्रे, मच्छींद्र पाटील यांच्यासह स्थानिक टॅक्सीचालक उपस्थित होते.

Check Also

बीसीटी विधी महाविद्यालयात पदवीदान सोहळा

मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई …

Leave a Reply