Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात

  • ट्रकची इकोला जोरदार धडक, बालकासह 10 जणांचा मृत्यू
  • खासगी बस उलटून दोघे ठार

माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळ रेपोली गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.19) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रकची इको कारला समोरासमोर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चार वर्षाच्या बालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथून अधिक उपचाराकरिता मुंबई येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा चक्काचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. या अपघाताची माहिती समजताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अपघात ठिकाणी व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे भेट देऊन अपघाताची माहिती घेतली, तर दुसरा अपघात कणकवलीजवळ खासगी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे झाला. अपघातात 2 प्रवाशी ठार, तर 28 जण जखमी झाले आहेत.
गोवा बाजूकडून मुंबईकडे जाणारा ट्रकने (क्र. एमएच 43 जी 7119) मुंबईहून महाडकडे जाणार्‍या इको कारला (क्र. एमएम 48 बीटी 8673) समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील अमोल रामचंद्र जाधव (वय 40 रा. हेदवी ता.गुहागर रत्नागिरी), निलेश चंद्रकांत पंडित (वय 45 रा.हेदवी ता. गुहागर, रत्नागिरी), दिनेश रघुनाथ जाधव (वय 30 रा. हेदवी ता. गुहागर, रत्नागिरी), निशांत शशिकांत जाधव (वय 23 रा. विरार पूर्व), स्नेहा संतोष सावंत (वय 45 रा. कलमबिष्ट ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग सध्या रा.जोगेश्वरी मुंबई), कांचन काशिनाथ शिर्के (वय 58 रा. चिपळूण जि.रत्नागिरी सध्या रा.नवी मुंबई), दीपक यशवंत लाड (वय 60 रा.कॉटन ग्रीन मुंबई), मुद्रा निलेश पंडित (वय 12 रा. हेदवी ता. गुहागर, रत्नागिरी सध्या रा. मुंबई), नंदिनी निलेश पंडित (वय 40 रा. हेदवी ता. गुहागर, रत्नागिरी सध्या रा. मुंबई) या नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर भव्य निलेश पंडित(वय 4 रा. हेदवी ता. गुहागर, रत्नागिरी सध्या रा. मुंबई) या बालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर अधिक उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.
दुसरा अपघात गोवा-मुंबई महामार्गावर कणकवलीजवळ खासगी बसचा ब्रेक अचानक फेल झाल्यामुळे झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे झालेल्या अपघातात 2 प्रवाशी ठार, तर 28 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 36 प्रवासी होते.  सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply