Breaking News

पनवेल महापालिकेच्या शहर कार्यकारी समितीची बैठक

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शहर कार्यकारी समिती मंगळवारी (दि. 21) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी समितीचे अध्यक्ष उपायुक्त कैलास गावडे यांनी केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता लाभार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी, राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियानाचे प्रतिनिधी, आरोग्य विभाग प्रतिनिधी, वस्तीस्तर संघाचे प्रतिनिधी व एनयुएलएमचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त बचतगट तयार करणे व त्यांना उपजिविकेचे साधन निर्माण करण्यावर चर्चा झाली. तसेच पथविक्रेत्यांकरिता प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देताना बँकाशी संबधित येणार्‍या अडचणी, त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. उपायुक्त कैलास गावडे यांनी प्रधानमंत्रीस्वनिधी व स्वयंरोजगार अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यासाठीदेखील बँकांनी सहकार्य करावे, असे सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply