खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग्य दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या योग शिबिराचे प्रमुख पाहुणे आहारतज्ञ कोमल कुलकर्णी आणि सुजाता मोहिते या होत्या. कोमल कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व पटवून देताना रोजच्या जीवनशैलीचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे योग प्रकार मुलांना प्रात्यक्षिकासह दाखविले. या योग शिबिराचे सूत्रसंचालन बारावी वाणिज्य शाखेच्या आस्था राज हिने आणि बारावी विज्ञानाच्या आरीद डिंगणकर या दोघांनी केले. या शिबिरास विद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.