Breaking News

धापया महाराजांचा दर्शनाला कर्जतमध्ये गर्दी

कर्जत : प्रतिनिधी : कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव  अक्षयतृतिये (दि. 7) पासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या  दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. उद्या बुधवारी (दि. 8) सकाळी नऊ वाजल्यापासून श्री धापया महाराज मंदिराच्या प्रांगणात शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेला कुस्ती आखाडा रंगणार आहे. मंगळवारी पहाटे सनई वादनाने मंदिरात प्रसन्न वातावरण निर्माण  झाले. त्यानंतर श्रींची पूजा करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र चंदने यांच्या हस्ते सपत्नीक लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. सायंकाळी  जनार्दन परांजपे, मनोज वरसोलीकर, गणेश शिंदे, लक्ष्मण चंदने आदींच्या मार्गदर्शनाखाली श्री धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुहासिनींनी धापया महाराजांची आरती केली. सायंकाळी जांभिवली-डोणे आदिवासी वाडीतील नारायण पवार आणि सहकारी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चाकरमान्यांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. बुधवारी सकाळपासून कुस्त्यांना सुरुवात होते. लहान पहेलवानांच्या कुस्त्या सकाळी रंगतात तर दुपारनंतर मोठ्या पहेलवानांच्या कुस्त्यांना सुरुवात होते. या कुस्ती आखाड्यात अनेक नामवंत कुस्तीगिर उपस्थिती दर्शवितात. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातील पहेलवान येथे येतात. या कुस्ती आखाड्याला शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply