Breaking News

राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण

मान्यवरांची उपस्थिती

पुणे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभाग आणि मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या वतीने ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी ऑनलाइन शरद रयत चषक आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. 2) पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात झाला.
या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, पश्चिम विभागाचे चेअरमन अ‍ॅड. राम कांडगे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार चेतन तुपे, अतुल बेनके, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगनाथ शेवाळे, सूर्यकांत पलांडे, मिना जगधने, विभागीय अधिकारी एस. टी. पवार, नीता शेट, डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या वेळी चंद्रभागा बाबूराव तुपे साधना कन्याशाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांच्याही कर्तृत्वाला संधी देणारे उपक्रम राबविण्याचे काम तसेच कर्मवीरांनी स्वीकारलेले विचार रूजविण्याचा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेने करावा.
महाविद्यालयीन स्तरावरील राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत प्रथम फेरीत महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांतून 670 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये मुलींचा सहभाग 75 टक्के एवढा उल्लेखनीय होता. प्रथम फेरीतून सुपर 81 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत शरद रयत चषकाचा मानकरी गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलीचा संघ ठरला आहे. त्यांचे कौतुक करण्यात आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply