Breaking News

रसायनीतील दिव्यांग खेळाडूची जागतिक स्पर्धेत निवड

रसायनी : प्रतिनिधी

रसायनीतील देवळोली गावचा रहिवासी दिव्यांग खेळाडू देविदास महादेव पाटील याची 21 ते 25 मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणार्‍या जागतिक आयसीएफ कॅनाईंन स्प्रिंट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प 12 ते 21 मेपर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक सेंटर, हंगेरी येथे होणार आहे. पोलंड येथे होणार्‍या जागतिक स्पर्धेला व यानंतर होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या कॅनाईंगच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे व तेथूनच भारतीय संघ पोलंडला रवाना होणार आहे.

या जागतिक स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातील फक्त तीन खेळाडू सहभागी होणार असून त्यातून महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणून रसायनी देवळोली येथील देविदासची निवड होऊन तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कॅनाईंग अ‍ॅण्ड कयाकिंग हा खेल ऑलम्पिकमध्ये असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तो मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. देविदास महाराष्ट्राचा व विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील खेळाडू असला, तरी महाराष्ट्र दिंव्याग खेळाडूला कोणतेही सहकार्य किंवा आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने रसायनी देवळोलीचा रहिवासी देविदास पाटील मध्य प्रदेशचा प्रतिनिधी म्हणून या स्पर्धेत खेळणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. देविदास पाटीलने बॉडीबिल्डर, व्हिलचेअर, तलवारबाजीत सुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. दिल्ली येथे झालेल्या 29 व्या सिनियर राष्ट्रीय कॅनाईन अ‍ॅण्ड कमाकिंग स्पर्धेत देविदास पाटील याने सिल्व्हर पदक संपादन केले आहे, तसेच या अगोदर उझबेकीस्तान या देशात झालेल्या एशियन कॅनाईंग स्प्रिंट स्पर्धेतसुद्धा त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. देविदास पाटील हा शेतकरी कुटुंबातील असून त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने रायगडच्या या खेळाडूस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे महाराष्ट्र राज्य महासचिव देवेंद्र उर्फ देवा अनंत पाटील (देवळोली, रसायनी) यांनी केले आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply