उरण : वार्ताहर
सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे शनिवारी (दि. 25) उरण मोरा येथील शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 80 दप्तरे व शैक्षणिक साहित्य पेन्सिल, कंपास पेटी, वह्या, कलर बॉक्स, पाटी आधी साहित्याचे वाटप करण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनचे पदाधिकारी दीपा देवळे, विशाल देसाई, प्रज्ञा जाधव, अमृता शंभुस, आकाश गुप्ते, राम रोकडे, रमेश देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मोफत दप्तराचे व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या साहित्याचे वाटप करण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन मार्फत असिस्टंट मॅनेजर सुषमा अवघडे, गट समन्वय लक्ष्मी माळी, सायन्स टीचर गोसावी प्राची यांच्या हस्ते दप्तरे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सुषमा अवघडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सांगितले की, आम्ही दिलेल्या शैक्षणिक साहित्य व दप्तराचा योग्य वापर करून तुमची शैक्षणिक प्रगती वाढवी हीच आमची अपेक्षा, तसेच प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की, शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने मुलांचे मनोबल वाढते, तसेच मुले शिक्षणापासून वंचित राहत नाहीत व शिक्षणाची जीवन ज्योत अखंड तेजोमय ठेवण्याचे काम सेवा सहयोग फाउंडेशनने केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत आहे. या वेळी प्राथमिक शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी, प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड, सहाय्यक शिक्षक सुगिंद्र म्हात्रे, अनिल पाटील, सेवा सहयोग संस्थेचे पदाधिकारी सुषमा अवघडे, लक्ष्मी माळी, प्राची गोसावी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक सुगिंद्र म्हात्रे यांनी करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.