Breaking News

पावसाळ्यासाठी ताडपत्रींना मागणी; बाजारपेठेत खरेदी-विक्री सुरू

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात सध्या मान्सूनचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळी कामांनाही सुरू झाली. त्यात प्रामुख्याने प्लास्टिकचा कागद, अस्तर, ताडपत्री यांना मोठी मागणी असते. स्थानिक बाजारपेठेत याची अनेक दुकाने थाटली असून महागाईचा फारसा परिणाम या व्यवसायावर झालेला नाही. त्यांची मागणी वाढली आहे. पहिल्याच पावसाने अनेकांची घरे गळू लागली. शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांनी पाऊस संपताच बाजारपेठेत धाव घेऊन प्लास्टिक कागद आणि कापड खरेदीला सुरुवात केली आहे. आपला माल सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक कागद व ताडपत्रीचा ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाचा फटका या व्यवसायाला बसला. त्यामुळे साहजिकच मालाची विक्री अत्यल्प प्रमाणात झाली. आता पावसाचे वेध लागल्याने प्लास्टिक विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. साधारणतः मेअखेरीस प्लास्टिक विक्रीला सुरुवात होते. मान्सूनपूर्व पावसापूर्वी नागरिक प्लास्टिकचे कागद, कापड आणून छतावर टाकतात. पिकांना झाकण्यासाठी, धान्य- चारा झाकण्यासाठी देखील या कापडाचा वापर केला जातो. त्याची ही खरेदी जवळपास 15 ते 20 दिवस अगोदर सुरू होते. पहिला पाऊसाचा जोर वाढल्यानंतर नागरिकांनीही प्लास्टिकचे कागद, कापड खरेदीला गर्दी केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply