Breaking News

सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा!

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा असा संदेश देत सुमारे 40हून अधिक कुटुंबांना गुरुवारी (दि. 9) कोळवाडी येथे वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे, कार्याध्यक्ष संजय कदम, खजिनदार केवल महाडिक, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, समितीचे सल्लागार दीपक महाडिक, समितीचे ज्येष्ठ सभासद विवेक पाटील, दीपक घोसाळकर, संतोष भगत, अनिल कुरघोडे, राजेश डांगळे, वचन गायकवाड, प्रवीण मोहकर, संतोष सुतार, हरेश साठे आदी सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या वेळी ज्यांना घरी बसून निराधार कुटुंबांना मदत कराविशी वाटते त्यांनी वस्तू स्वरुपात पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीकडे संपर्क साधून वस्तू स्वरूपात मदत पुरवावी. ही मदत निराधार व गरजू कुटुंबांपर्यंत पोहोच केली जाईल. याकरिता समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे (9930234363) सरचिटणीस मंदार दोंदे (7039160086) कार्याध्यक्ष संजय कदम (9820168055), खजिनदार केवल महाडिक (9320646555), सल्लागार सुनील पोतदार (9223345249), सल्लागार दीपक महाडिक (9323233435) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply