Breaking News

अलिबागमध्ये शाळेची घंटा वाजली!; चिंतामणराव केळकर विद्यालय झाले सुरू

अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची सोमवारी (दि. 27) पुन्हा घंटा वाजली. शाळेमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून अलिबागसह जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये एप्रिल महिन्यापासून बंद होती, पण आता राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने शासनाने कोविड नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पालकांच्या संमतीने कोरोनाचा प्रादूर्भाव कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरू होऊ लागल्या आहेत. अलिबागमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल, चिंतामणराव केळकर विद्यालय आणि जिल्ह्यातील इतर शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाली. कोरोनाच्या अनुषंगाने आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेतील वर्ग सॅनिटायझर केले आहेत. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची तापमान तपासणी आणि सॅनिटायझर देऊन प्रवेश दिला जात आहे. शाळेत एका बेंचवर एक विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. शाळेत एक दिवस आड विद्यार्थी येणार असून सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply