Breaking News

बोर्ली खाडीपात्रातील कांदळवनतोड

अवैध भरावामुळे पूरसदृश्य स्थिती; ग्रामस्थ आक्रमक

रेवदंडा : प्रतिनिधी

बोर्ली खाडीपात्रातील कांदळवन तोडून अवैध भराव करण्यात आला आहे. त्यामुळे  पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोर्ली ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन आक्रमक भुमिका घेतली असून पावसाळ्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी धनदांडग्यांसह प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.

बोर्ली खाडीपात्रातील शासकीय जागेवरील कांदळवन तोडून, अवैध भराव केल्याने पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बोर्ली साईमंदिरात ताराबंदर कोळी समाज, बोर्ली कोळी समाज, पंचकुम समाज, मुस्लिम समाज, बौध्द समाज यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते.

गतवर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने  बोर्ली बाजारपेठेत पूराचे पाणी घुसले होते. त्या वेळी बाजारपेठेतील व्यापार्‍यांना मोठे आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले होते. कांदळवन तोडीने तसेच अवैध भरावामुळे भविष्यात तशा प्रकारची स्थिती येईल, अशी भिती सभेत व्यक्त करण्यात आली.

बोर्ली खाडीपात्राजीक गट क्रमांक 49 या शासकीय जागेतील कांदळवन तोडून तेथे भराव करण्यात आला आहे, या अवैध कामाविरोधात निषेधाचा ठराव या सभेत करण्यात आला. तसेच पावसाळ्यात पूर आल्यास त्याला कांदळवनाची तोड  व अवैध भराव करणारा गट क्रमांक 54 चा मालक आणि प्रशासन जबाबदार राहील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या सभेस बोर्ली, ताराबंदर, सुरई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply