Breaking News

युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा युवा वॅारिअर्सची बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत शनिवारी (दि.2) पनवेल येथे झाली. या वेळी युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.
पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, सरचिटणीस दिनेश खानावकर, खारघर अध्यक्ष नितेश पाटील, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक, कर्जत अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर, खालापूर अध्यक्ष नागेश पाटील, अभिषेक भोपी, अक्षय सिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी देवांशु प्रबाळे यांची युवा वॉरियर्सच्या जिल्हा संयोजकपदी तसेच यश भोईर व आयुष किंद्रे यांची जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे विचार घरोघरी पोहचवून पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सूचित केले. त्याचप्रमाणे नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही लोकांमध्ये जाऊन पक्ष वाढवा, असे आवाहन केले. युवा वॅारिअर्स जिल्हा संयोजक देवांशु प्रभाळे यांनी लवकरच जिल्ह्याच्या प्रत्येक बुथवर युवा वॅारिअर्सची बांधणी करण्याची ग्वाही दिली.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply