पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आग्रही मागणी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे पाणीप्रश्नावर पूर्वनियोजित बैठक सोमवारी (दि. 27) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली.
या बैठकीत करंजाडेमधील पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शहरास 15 एमएलडी मागणीच्या तुलनेत 50 टक्के पाणीकपात होत असल्याने सद्यस्थितीत सरासरी सात-आठ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले.पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने सिडकोला सांगण्यात आले असून या आठवड्यात सिडको सहव्यवस्थापकीय संचालक, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्यासह उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे. एमजेपी व सिडकोच्या समन्वयातून पाणीपुरवठा 15 एमएलडीपर्यंत करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
करंजाडे शहराच्या मागच्याबाजूने असलेल्या एमजेपीच्या जलवाहिणीतून लवकरच करंजाडे शहरास पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा या वेळी देण्यात आली. सेक्टर-6 करिता नव्याने तयार करण्यात आलेल्या जलवाहिनीतून उद्यापासून पाणीपुरवठा सुरू करण्यात असल्याचे सांगितले गेले. सेक्टर 6मधील उंचावर असलेल्या सोसायट्यांना पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार असल्याचे सिडको अधिकार्यांनी मान्य केले.
या बैठकीला भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, सिडको पाणीपुरवठा कार्यकारी अभियंते श्री. चौथानी, श्री. गायकवाड, पाणीपुरवठा अभियंते श्री. जगदाळे यांच्यासह भाजप वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, करंजाडे शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, युवा नेते अतिश साबळे, शहर उपाध्यक्ष दिनेश धामनस्कर, शहर उपाध्यक्ष नरेश दिवेकर, महिला कार्यकर्त्या वैशाली जगदाळे, पराग बने, संतोष मौर्या, सचिन गोरड, रमेश राठोड, गोपाल काळे आदी उपस्थित होते.