मुंबई : प्रतिनधी
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी (दि. 9) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेे. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
प्रदीप पटर्वधन यांनी अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. गिरगावात राहणार्या पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. त्यानंतर ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. 1985 साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका साकारली. या नाटकातील भूमिकेने त्यांना खर्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.
याशिवाय पटवर्धन यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यासोबतच ‘होल्डिंग बॅक’ (2015), ‘मेनका उर्वशी’ (2019), ‘थँक यू विठ्ठला’ (2007), ‘1234’ (2016) आणि ‘पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’ (2016) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …