Saturday , March 25 2023
Breaking News

मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये स्वरांश कोळी आठवा

बेलापूर ः प्रतिनिधी – 2018-19 मध्ये पार पडलेल्या मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमधये सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरातून सहभाग घेतला होता. त्यात स्वरांश सागर कोळी याने आठव्य क्रमांकार झेप घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या बुध्दी व कौशल्याचा ठसा उमटविल्याने भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये त्याचे कौतुक होत आहे.

स्वरांग कोळी याने शालेय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्यस्तरीय परीक्षादेखील बारावा क्रमांक मिळवून मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये आपले स्थान कायम ठेवले हेाते. दि. 13 एप्रिल 2019 रोजी झालेल्या नॅशनल चॅम्पियनशीपमध्येही आठवा क्रमांक पटकाविला. त्याना दोन गौरवचिन्ह, एक रौप्यपदक देऊन गौरविण्यात आले. त्याला मास्टर माईंड संस्थेचे संस्थापक बिपिन चेड्डा, भारती विद्यापीठ शाळेचे डायरेक्टर डॉ. विलासराव कदम, मुख्याध्यापक अल्ताप शर्मा, सोमा घोष, रोहिनी जगदाळे, रश्मी कुलकर्णी, श्रीमती भोरे, श्रीमती कासारे यांनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply