Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे मोफत वह्यावाटप

भाजप नेते अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने व भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा उपाध्यक्ष शुभ पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत ह्यांनी वह्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात शुभ पाटील याला उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, खारघर युवा मोर्च्या अध्यक्ष विनोद घरत, सोशल मीडिया सहसंयोजिका मोना अडवाणी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, भाजप खारघर मंडळ चिटणीस सचिन वास्कर, महिला मोर्चा चिटणीस अंकिता वारंग, ज्येष्ठ नेते सोमनाथ पाटील, ज्येष्ठ नागरिक सेल संयोजक नवनीत मारू, खारघर युवा मोर्चा चिटणीस फुलाजी ठाकूर, पप्पू खामकर, भाजप कार्यकर्ते महेश भोईर, शोभा लवटे, विनोद खानावकर, शाळेच्या प्राचार्य श्री. चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply