Breaking News

वाशी ते मुंबई बससेवा खारघरपर्यंत विस्तारित करावी

भाजप खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ यादरम्यान देण्यात येणारी वातानुकूल एएस 881या क्रमांकाची बससेवा खारघरपर्यंत विस्तारीत करण्यात यावी, अशी मागणी भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांना निवेदन दिले आहे. बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ यादरम्यान 24 तास वातानुकूल एएस 881या क्रमांकाची बससेवा चालू करण्यात आली आहे. वाशीहून व विमानतळावरुन दर तासाला या बसेस सुटत आहेत. टी1 व टी2 दोन्ही टर्मिनल्स येथे वाद्रे कुर्ला संकुलामार्गे जाणार्‍या या बसेसना साधारण 1 तास 15 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी प्रवास शुल्क 150 रुपये इतकेच असून सामानाचे शुल्क आकारण्यात येत नाही. हि बससेवा नवी मुंबईतून मुंबई विमानतळाकडे जाणार्‍या प्रवाशांना अतिशय सोयीची असून उबेर, ओला, टँक्सी सारख्या महागड्या सेवांपेक्षा किती तरी पटीने स्वस्त व किफायतशीर आहे. भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांना खारघरवासियांच्या वतीने एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, ही सेवा खारघरपर्यंत विस्तारित केल्यास खारघरच्या रहिवाशांसहित बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा येथील प्रवाशांना या बससेवेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.

महापौरांनी घेतली तत्काळ दखल

महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी या बससेवेची उपयुक्तता व ब्रिजेश पटेल यांच्या निवेदनाची तत्काळ दखल घेतली आहे. त्यांनी या बससेवेचा लाभ पनवेल महानगरपालिका परिसरातील प्रवाशांनाही व्हावा यासाठी ही बससेवा खारघर शहरापर्यंत विस्तारित करावी, अशा आशयाच्या मागणीचे पत्र बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पाठविले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply