

खांदा कॉलनी ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कैलासवासी चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरणानिमित्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. स्व. चांगू काना ठाकूर यांना अभिवादन करताना मान्यवर, तर दुसर्या छायाचित्रात दत्तात्रेय नवले यांचा सत्कार करताना लोकनेते रामशेठ ठाकूर.