Breaking News

जिल्ह्यातील धोकादायक इमारतीबाबत ठोस भूमिका हवी

रायगड जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार  जिल्ह्यात 639 इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी 96 इमारती अतिधोकादायक आहेत. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता पनवेलमध्ये प्रमाण अधिक आहे. अलिबागमध्ये 26 इमारती अतिधोकादायक आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुबईतील कुर्ला येथे धोाकादायक इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी महाड शहातीली इमारत कोसळली होती. त्यातही अनेकांना प्राण गामवावे लागले होते. त्यामुळे  जिल्ह्यातील अतिधोकादयक इमारंतींबाबत देखील स्थानिक प्रशासनाने ठोस भूमिका घ्याला हवी.

रायगड जिल्ह्यातीली धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांना महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायत अधिनियम 1965 चे कलम 195 अन्वये नोटिस बजावण्यात आली आहे. या इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले आहे. अशा नोटिसा देऊन रहिवाशी आपल राहत घर सोडत नाहित. ज्या इमारती अतिधोकादायक आहेत तेथील रहिवाशांचे सक्तीने स्थालांतर करायला हवे. बर केवळ खाजगी इमारतीच धोकादयक आहेत असे नही. शासकीय इमारती देखील धोकादयक आहेत. त्यामुळे शासने केवळ नोटीस बजावून गप्प नाबसता  ठोस भूमिका घ्यायला हवी .

धोकादायक ईमारतीप्रमाणे धोकादायक पुलंचा देखील प्रश्न आहे. 2 ऑगस्ट 2016 मुंबई गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदी वरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला होता. त्यानंरत  मुरुड तालुक्यातील काशिदजवळील पूल अतिवृष्टीमुळे वाहून हेला. त्यावेळी जिल्ह्यातील  जिर्ण आणि धोकादायक पुलांचा प्रश्न  चर्चेत आला आहे. पावसाळा सुरू झाला की धोकदायक इमारती व पुलांची चर्चा सुरू होते. परंतु ठोस उपाय योजना होत नाहित. आजही या जिल्ह्यात अनेक पूल धोकादयाक आहेत.  या  धोकादायक पूलांच्या दुरूस्तीबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेच आहे.

रायगड जिल्ह्यात मुबई – गोवा महामार्गावर पनवेल व  महाड उपविभागात 13 लहान ब्रिटीशकालिन पूल आहेत. तर काळ आणि गांधारी नदीवर मोठे ब्रिटीश कालिन पूल आहेत. काळ नदीवरील पूल  1871 मध्ये  तर गांधारी नदीवरील पूल  1945 साली बांधण्यात आला आहे. कोलाड जवळ कुंडलिका नदीवर, तर आंबा नदीवर पालीजवळ  जूना  पुल आहे. सावित्री नदीवरील महाड येथील दादलीपूल, वीर टोळ मार्गावरील टोळ पूल कमकूवत झाले आहेत. अलिबाग यांच्या कार्यक्षेत्रात राज्यमार्गावरील 139 पूल आणि जिल्हा मार्गावंरील 79 पूलांचा समावेश आहे.  अलिबाग – रेवस मार्गवरील खडताळ पूल देखील जुना आहे.  रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणारे 14 पूल धोकादायक आहेत. जिल्ह्यात असे अनेक पूल आहेत जे ब्रिटीशकालीन आहेत. काही स्वातंत्र्यनंतर बांधण्यात आले आहेत. त्यातील काही  आजही धोकादयाक अवस्थेत आहेत.  त्यामुळे या पूलांच्या दुरूस्तीबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेच आहे. हे पूल  तुटल्यास त्याचा मोठा फटका रस्ते वाहतूकीवर होणार आहे. तसेच लोकांचे प्रणही जाऊ शकतात.

काशिद पूल धोकादायक बनला असल्याची तक्रार गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र बांधकाम विभागाने जुजबी उपाययोजना करण्यापलीकडे काही केले नाही. त्यामुळे हा पूल पडला होता. आजही पूलांच्या दरुस्तीबाबत लोक पत्रव्यवहार करतात. लोकांच्या सुचनांचा देखील सरकारी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. अधिकार्यांनी आपल्यालाच सर कळत अशा तोर्यात राहू नये. जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूलांचे स्टक्चरल ऑडीट करून  किमाना अतिधोकादाय पूलांवरील वाहतुक बंद करायाला हवी. ज्याठिकाणी काही ठिकाणी जुन्या पुलांना पर्यायी पूल बांधणे आवश्यक आहे.

सावित्री नदिवारी पूल वाहून गेल्यानंतर तेथे पर्यायी नवीन पूल तातडीने बांधण्यात हाला. काशी येथील पूल देखील बांधण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतरही जुन्या पुलांच्या बाजूला नवी पूल बांधले पाहिजेत. उदाहरणच द्यायचे झाले तर अलिबाग तालुक्यात अलिबाग – रेवस मार्गावरील वरसोली येथील पूलाचे द्यावे लागेल. वरसो फार जूना आहे. येथे नवीन पूल बांधण्यात यावा अशी मगणी होत आहे. परंतु तेथे नवीन पूल बांधण्यात आलेला नाही. या जुन्या पुलाची डागडूजी केली जाते. खरतर या पूलाला पार्यायी पूल बांधणे आवश्यक आहे. कारण या पूलावरून आवजड वाहतुक होते. त्यामुळे येथे पर्यायी पूल उभारणे आवश्यक आहे. दोन वर्ष कोवीडमध्ये गेली. या कालावधीत विकासकाम थांबवीण्यात आली होती. शासनाचा बहुतांश निधी कोवीडवर खर्च केला जात होता. आत राज्याची आर्थिक परिस्थितीती सावरतेय त्यामुळे विकासकामांना निधी पालबध्द होऊ शकेल. शासनाने धोकादायक पुलांच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घ्यायला हवे.

नादुरुस्त पूलांचा प्रश्नही ऐरणीवर

धोकादायक इमारतीप्रमाणे धोकादायक पूलांचादेखील प्रश्न आहे. 2 ऑगस्ट 2016 मुंबई गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदी वरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला होता. त्यानंरत  मुरुड तालुक्यातील काशिदजवळील पूल अतिवृष्टीमुळे वाहून हेला. त्यावेळी जिल्ह्यातील  जिर्ण आणि धोकादायक पुलांचा प्रश्न  चर्चेत आला आहे. स्ट्रक्चरला ऑडिटची मागणी जोर धरु लागला. पावसाळा सुरू झाला की धोकदायक इमारती व पुलांची चर्चा सुरू होते. त्यानंतर ठोस उपाय योजना होत नाहित. हे नेहमीच झाले आहे. इमारतीप्रमाणे जिल्ह्यात अनेक पूल धोकादयाक आहेत.  याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply