सिडनी : वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पोटाच्या दुखापतीसह खेळताना ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील 300वा विजय साकारला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सेरेना विल्यम्स यांनीही आगेकूच केली, मात्र डॉमिनिक थीमला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या 14व्या मानांकित मिलोस राओनिकला 7-6 (7-4), 4-6, 6-1, 6-4 असे चार सेटमध्ये नमवले. हा सामना तीन तासांपर्यंत लांबला. जर्मनीच्या सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने 23व्या मानांकित दुसान लाजोव्हिचवर 6-4, 7-6 (7-5), 6-3 अशी मात केली. बल्जेरियाच्या 18व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमला 6-4, 6-4, 6-0 अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. दिमित्रोव्हने 1 तास आणि 58 मिनिटांतच हा सामना जिंकला.
महिला एकेरीत अमेरिकेच्या 39 वर्षीय सेरेनाने आर्यना सबालेंकावर 6-4, 2-6, 6-4 असा विजय मिळवला. रोमानियाच्या दुसर्या मानांकित सिमोना हालेपने इगा स्विआँटेकवर 3-6, 6-1, 6-4 अशी पिछाडीवरून सरशी साधली. जपानच्या तिसर्या मानांकित नाओमी ओसाकाने गर्बिन मुगुरुझावर 4-6, 6-4, 7-5 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिच्यासमोर शि सू-वेईचे आव्हान असेल. सु-वेईने मार्केटा वोंड्रुसोव्हाला 6-4, 6-2 असे सहज पराभूत केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …