मुरूड : प्रतिनिधी
जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून अँटिकरप्शन फाउंडेशनच्या वतीने मुरूड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांना शुक्रवारी (दि. 1) मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी आपण डॉक्टरांकडून उपचार व सल्ले घेत असतो. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा देवदूत असतो, असे प्रतिपादन फाउंडेशन रुपेश दांडेकर यांनी या वेळी केले. फाउंडेशनचे डॉ. विक्रमजीत पडोळे, डॉ. विजय हडबे, धनंजय म्हात्रे, अमोल शेडगे, मंगेश कौलकर, राहुल कासार, श्रुतिका कांबळे, निर्मला भोसले, दीपाली घराणे, बालाजी घाटे, सूरज पवार, सुहास सानप आदी उपस्थित होते.